व्यसनमुक्ती एक संकल्प मासिक जुन २०२०
महिला आयोगातर्फे डिजिटल प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न












आज srtmu विद्यापीठात तंबाखू मुक्ती चित्र प्रदर्शन





आज srtmu विद्यापीठात तंबाखू मुक्ती चित्र प्रदर्शन माध्यम शास्त्र विभागाचे विभाग प्रमुख dr. दीपक शिंदे sir आणि भावी पत्रकार मंडळी, सोबत काम करणार आहेत हे विद्यार्थी.
अभिनेता सयाजी शिन्दे यांच्या तंबाखू मुक्त शाळा, नांदेड या कार्यास शुभेच्छा



आज srtmu नांदेड येथ कर्यक्रमात सलाम मुंबई फाऊंडेशन सोबत घेत असलेल्या तंबाखू मुक्त शाळा नांदेड या कार्यास सिने अभिनेता सयाजी शिन्दे सरांनी शुभेच्छा दिल्या सोबत कै. सोपानराव तादलापूरकर क्रीडा मंडळ अध्यक्ष कैलाश गायकवाड srtmu नांदेड चे कुलगुरू उद्धव भोसले sir उपस्थित होते
पंचायत राज प्रशिक्षणासाठी कैलास गायकवाड यांची निवड



नांदेड जिल्ह्यातील सर्व शाळा 4 फेब्रुवारी 2020 पूर्वी तंबाखूमुक्त कराव्यात – प्रशांत दिग्रसकर






नांदेड दि 21 आज नांदेड जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख यांची जिल्हा प्रशिक्षण संस्था येथे सलाम मुंबई फाउंडेशन व महाराष्ट्र राज्य शैक्षणिक प्रशिक्षण संचनालय पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या तंबाखू मुक्त शाळा अभियाना अंतर्गत आढावा बैठक घेण्यात आली या बैठकीला अध्यक्ष म्हणून नांदेड जिल्हा परिषदेचे शिक्षण अधिकारी प्राथमिक श्री प्रशांत दिग्रसकर साहेब , तर प्रमुख पाहुणे म्हणून माध्यमिक शिक्षण अधिकारी श्री बाबासाहेब कुंडगिर साहेब , प्राचार्या श्रीमती जयश्री आठवले मॅडम, उपशिक्षण अधिकारी श्री बंडू आमदूरकर सर , सलाम मुबंई फाउंडेशन चे प्रकल्प संचालक श्री अजय पिळणकर सर , प्रा देशमुख सर, प्रा धुमाळ सर, आदी व्यासपीठावर उपस्थित होते या सर्वांचा यथोचित सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक तंबाखु मुक्त शाळा अभियानाचे नांदेड चे जिल्हा समनव्यक रवी ढगे यांनी केले त्यांनी आपल्या जिल्ह्यातील तंबाखु मुक्त शाळा या अभियान अंतर्गत 3445 पैकी 442 शाळा अँप वर आहेत तर 200 शाळा तंबाखु मुक्त झाल्या असल्याचे सांगितले जिल्ह्यातील उर्वरित शाळा तंबाखु मुक्त होण्यासाठी सर्वांनी प्रमाणिक प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे सांगितले नंतर माध्यमिक शिक्षण अधिकारी श्री बाबासाहेब कुंडगिर साहेब यांनी सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळा ह्या तंबाखु मुक्त लवकरात लवकर कश्या होतील यासाठी सर्वांनी मिळून काम करून हे अभियान यशस्वी करावे नंतर अध्यक्षीय समारोप करतांना श्री प्रशांत दिग्रसकर साहेब म्हणाले आपल्या जिल्हा तंबाखू मुक्त शाळा अभियानात गतिमान होण्याची गरज असून येणाऱ्या पिढीला व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी हे अभियान संजीवनी असून यात गेल्या अनेक वर्षे झाली या अभियानास सक्रिय काम करणारे जिल्हा समनव्यक रवी ढगे, सलाम मुंबई फाउंडेशन चे सचिन वानखेडे , मारोती पवार यांचे अभिनंदन केले व सर्वानी सक्रीय सहभागी होऊन, सर्व केंद्रप्रमुख यांचा आढावा घेऊन ज्या केंद्रप्रमुख याने आपले केंद्र तंबाखु मुक्त शाळा यांचे केले त्यांचे अभिनंदन केले व येणाऱ्या 4 फेब्रुवारी 2020 पूर्वी सर्व केंद्र प्रमुख यांनी आपल्या केंद्रातील सर्व शाळा तंबाखु मुक्त शाळा म्हणून सलाम मुंबई फाउंडेशन ने दिलेले 11 निकष मोबाईल अँपवर भरून टाकावेत यासाठी मी स्वतः 15 दिवसाला आढावा घेणार असल्याचे सांगितले शेवटी मेणबत्ती पेटवून तंबाखु मुक्त शपथ सर्वाना देण्यात आली अर्धापुर येथील उपक्रमशील पुरस्कार प्राप्त शिक्षक मारोती पवार सर यांनी त्यांच्या वतीने स्वतःच्या खर्चाने तंबाखु मुक्त शाळा बॅनर चे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले नंतर सलाम मुंबई फाउंडेशन चे सचिन वानखेडे यांनी 11 निकष सांगितले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री रमेश पवार यांनी तर आभार संस्था प्रतिनिधी कैलास गायकवाड यांनी मानले.
दीनदयाळ विद्यालयात ‘तंबाखूमुक्त महाराष्ट्र’ कार्यक्रम संपन्न

तंबाखू मुक्त शाळा व सलाम मुंबई फाऊंडेशन mobile app

आज 22-11-2019 उप जिल्हाधिकारी सचिन खलाळ सरांना सर्व गटशिक्षण अधिकारी यांना तंबाखू मुक्त शाळा व सलाम मुंबई फाऊंडेशन aap डाऊन लोड करण्या साठी आव्हान करावे या साठी निवेदन देतेवेळेस जिल्हा समनवयक कैलाश गायकवाड
सर्व धर्म समभाव देखावा सहभाग
आज दिनांक 17-11-2019 बालमोहत्सव निमित्त महिला व बालविकास विभाग अंतर्गत जिल्हा महिला व बालविकास कार्यालय नांदेड द्वारा आयोजित कार्यक्रमात कै. सोपानराव तादलापूरकर क्रीडा मंडळ संचलित व्यसन मुक्ती संकल्प ग्रुप नांदेड चे कलाकार सर्व धर्म समभाव देखावा सहभाग
कृष्ण उत्तमराव वाघमारे
साधना कैलाश गायकवाड
रमेश ज्ञानोबा कांबळे
ओणमकार गुलाब नाईक
सुमेध राजू कांबळे
माधव प्रल्हाद कंठाळे
सिद्धार्थ राजू कांबळे
माहेस्वरी सोपानराव तादलापूरकर (सचिव )
कैलाश रामचंद्र गायकवाड ( अध्यक्ष )





आज दिनांक 17-11-2019 रोजी धनगर वाडी नांदेड येथे बालमोहत्सव निमित्त कै सोपानराव तादलापूरकर क्रीडा मंडळ तर्फे सर्व धर्म समभाव हा संदेश देण्यात आला यात वेग वेगळ्या धर्माची वेशभूषा करून बालक आले होते या कार्यक्रमास जिल्हाधिकारी अरुण डोंगरे साहेब यांनी देखाव्याची पाहणी करून आमच्या कार्यास शुभेच्छा दिल्या
तंबाखू मुक्त शाळा चित्र रथ







माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी नांदेड जिल्ह तंबाखू मुक्त शाळा चित्र रथाला आज सकाळी शुभेच्छा देऊन तंबाखू मुक्त नांदेड जिल्हा साठी सहकार्य करण्याचे आश्वसन दिले. हा चित्र रथ संपूर्ण महाराष्ट्र फिरणार तंबाखू मुक्त शाळे साठी याची सुरुवात 10-10-2019 नांदेड पासून सुरु होणार.
आण्णा भाउ साठे समाज भूषण पुरस्कार प्रदान

साहित्य रत्न आण्णा भाऊ साठे जिल्हा जयंती मंडळा नांदेड तर्फे कै
सोपानराव तादलापुरकर क्रिडा मंडळ व्यायाम शाळा मुखेड या संस्थे ला पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले पुरस्कार स्विकारला नंतर संस्थे चे अध्यक्ष कैलाश रामचंद्र गायकवाड व ग्रुप.

मतदान जनजागृती कार्यक्रम
आमच्या संस्थेतर्फे येणाऱ्या निवडणुकांना डोळ्यासमोर ठेऊन मतदान जनजागृती कार्यक्रम राबवण्यात आला. ह्या कार्यक्रम अंतर्गत चित्रप्रदर्शन भरवण्यात आले.
आमच्या संस्थेचे चालक श्री. कैलास गायकवाड यांची मुलाखत बांधण्यासाठी इथे क्लिक करा.
https://www.youtube.com/watch?v=dkjT5B42rkA&feature=youtu.be






हे माझे सामाजिक कार्य चे गुरु डॉ पद्मश्री अभय बंग यांची भेट घेतली दि २९ – ११- २०१८

दि 08-12-2018 रोजी जिल्हा ग्रंथालय नांदेड यांच्या वतीने घेण्यात आलेल्या कार्यक्रमात संस्थे च्या वतीने ग्रंथ दिंडीत व्यसन मुक्ति जनजागृती अभियान राबविले या कार्यक्रमात मानिय जिल्हाधिकारी अरुण डोंगरे सर जिल्हा ग्रंथालय अधिकारी व संस्थे चे अध्यक्ष कैलाश गायकवाड सचिव माहेश्वरी तादलापुरकर व इतर सर्व सदस्य उपस्थित होते.
नांदेड जिल्हा अधिकारी सुरेश काकाणि यांना व्यसनाचे दुष्परिणाम या विषयी फ्रेम भेट देताना अध्यक्ष कैलाश गायकवाड निलेश तादलापुरकर क्रिडा अधिकारी यादव सर.

आमच्या इतर उपक्रमांबद्दल तपशिलामध्ये जाणून घेण्यासाठी ही पुस्तिका बघा.
tadalapurkar Upakram
सामाजिक न्याय दिनी शालेय साहित्याचे मोफत वाटप.सिडको- नांदेड कै. सोपानराव ताडळापूर किरडा मंडळ व व्यायाम शाळा च्या वतीने राजश्री छत्रपती शाहू महाराज्यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय दिनाचे औचित्य साधून गरीब व होतकरू विदगयर्थ्यना शालेय साहित्याचे वाटप मोफत वाटप करण्यात आले.याप्रसंगी व्यसन मुक्ती मासिकाचे वाटप करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थेचे अध्यक्ष, कैलास गायकवाड यांची उपस्थिती होती तर प्रमुख वक्ते मनुन, अण्णाभाऊवादी कम्युनिस्ट पार्टीचे राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी, प्रा.सदाशिव भुयारे यांनी विधर्थ्यना मार्गदर्शन केले.कार्यक्रमासाठी नांदेड जिमनस्टिक क्लुब चे सेक्रेटरी जयपाल रेड्डी यांची प्रमुख उपस्थिती होती. सुत्रसंचालन सिरसाट सर उमरीकर यांनी केले.

इतर उपक्रम












नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य विभागीय संघटक कैलाश गायकवाड यांच्या तर्फे संत गाडगेबाबा जयंती निमित्त आज,23/02/2024 रोजी सिडको शिवाजी महाराज पुतळा या ठिकाणी व्यसनमुक्ती वर महामाणावंचे विचार हे पुस्तक मान्यवरांना वाटप करण्यात आले राऊ प्रतिष्ठान तर्फे पर्यावरण जनजागृती पोस्टर प्रदर्शन भरवान्यात आले






























